परिवहनमंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी पुन्हा एकदा समन्स बजावले आहे.

परब यांना येत्या २८ सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी त्यांना ३१ ऑगस्ट रोजी समन्स पाठवण्यात आले होते. मात्र त्या वेळी त्यांनी नियोजित कार्यक्रमाचे कारण देत जबाब नोंदवण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती.

मात्र आता ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावल्याने अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परब यांना २९ ऑगस्ट रोजी ईडीने पहिले समन्स पाठवले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या वसुली प्रकरणात परब यांना पहिल्यांदा समन्स जारी करण्यात आले होते.

Advertisement