Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

‘या’ उद्योगपतींवर ‘ईडी’ च्या धाडी

ईडी भलतीच सक्रिय झाली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सव्वा चार कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केल्यानंतर ‘ईडी’ ने व्हिडीओकाॅन उद्योग समूहाचे मालक वेणुगोपाल धूत आणि माजी खासदार राजकुमार धूत यांच्यांशी संबंधित दोन ठिकाणी ‘ईडी’ने छापे टाकले.

कोठे टाकल्या धाडी?

‘ईडी’ने व्हिडिओकॉन या बड्या कंपनीशी संबंधित दोन ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. व्हिडिओकॉनचे मालक राजकुमार धूत आणि वेणुगोपाल धूत यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.

‘ईडी’ने मलबार हिल आणि गोवंडीत धाड टाकली आहे. आयसीआयसी बँकेच्या कर्जप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

औरंगाबादेतही धाडी

‘ईडी’ने एकाच वेळी अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. मुंबईतील मलबार हिल आणि गोवंडीबरोबरच औरंगाबादेतही ‘ईडी’ने धाड टाकली. एकाचवेळी ही सगळी कारवाई करण्यात आली आहे.

ईडीने काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरी आणि कार्यालयांमध्ये अशाचप्रकारे धाडी टाकल्या होत्या. अगदी त्याच पद्धतीने या प्रकरणातही ‘ईडी’ने कारवाई केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओकॉन ग्रुपला 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेने 3250 कोटींचं कर्ज दिल्याचं हे प्रकरण आहे. एकूण 40 हजार कोटींच्या कर्जाचा हा एक भाग होता, जे व्हिडीओकॉनने एसबीआयच्या नेतृत्त्वातीतल 20 बँकांकडून घेतलं होतं.

Advertisement

2010 मध्ये 64 कोटी रुपये न्यूपॉवर रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेड ला दिले. ही कंपनी धूत यांनी दीपक कोचर आणि इतर दोन नातेवाइकांसह मिळून उभी केली, असा आरोप आहे.

पदाचा गैरवापर करून कर्ज

याप्रकरणी ईडीने गेल्यावर्षी 7 सप्टेंबर रोजी आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती.

चंदा कोचर यांनी पदाचा गैरवापर करुन व्हिडीओकॉन कंपनीला कर्ज दिले असा आरोप आहे. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन कंपनीचे मालक धूत यांनी मिळून एक कंपनी उभारली होती.

Advertisement

या कंपनीलाही कोट्यवधींचे कर्ज देण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे. याच प्रकरणी ईडीचा तपास सुरू आहे.

चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कर्जदाराकडून आर्थिक लाभ दिले गेले, असा आरोप करण्यात आला.

आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर सहा महिन्यातच धूत यांनी कंपनीची मालकी दीपक कोचर यांच्या ट्रस्टला केवळ नऊ लाख रुपयांमध्ये विकल्याचाही आरोप आहे

Advertisement

अगोदरच गुन्हे

ईडीने या प्रकरणात चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉनचे प्रमुख वेणुगोपाल धूत आणि इतरांविरोधात बँकेच्या कर्जात हेराफेरी आणि पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला.

 

Advertisement
Leave a comment