मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Underworld don Dawood Ibrahim याच्याशी संबंधित असलेल्या मालमत्ता व्यवहारांच्या संदर्भात ईडीची छापेमारी सुरू आहे. मात्र आता महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकीय नेताही या प्रकरणात अडकणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मुंबईमध्ये ईडीच्या टीमने मोठी कारवाई (ED Raids in Mumbai) करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मुंबईतील विविध ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरू आहे.
या छापेमारीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीवर ही छापेमारी चालू आहे. ही छापेमारी सहा ठिकाणी चालू असून दक्षिण मुंबई (South Mumbai) परिसरात अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या या धाडसत्राचे महाराष्ट्रातील (Maharashatra) एका राजकीय नेत्याशी संबंध असल्याचा संशय त्यांना आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
तसेच हा संशयित राजकीय नेता कोणत्या पक्षाचा आहे? आणि कोण आहे? याबाबतही कुठलीही माहिती अजून समजलेली नाही. मात्र हा राजकीय व्यक्ती शोधण्यासाठी ईडीकडून सखोल चौकशी चालू आहे.
या मालमत्तांमध्ये राजकीय नेत्याचा संबंध असून १९९३ बॉम्ब स्फोटातील आरोपी, हसिना पारकर (Hasina Parkar) यांच्याशी संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या धाडसत्रात एनआयएच्या टीमचीही तपासात मदत घेतली जात असल्याची माहिती समोर येत आहे.