भारतातील अनेक वास्तूंचा समावेश जागतिक वारसा यादीत झाला आहे. वारक-यांची श्रद्धास्थाने असलेल्या देहू, आळंदीचा समावेश जागतिक वारसा यादीत करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार संभाजीराजे यांनी दिले.

तुकारामांच्या पालखी सोहळ्यास उपस्थिती

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास खासदार संभाजीराजे उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे देहूगाव आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे आळंदी हे क्षेत्र आणि वारी युनेस्कोच्या जागतिक अमूर्त हेरिटेजमध्ये समाविष्ट करावे, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

संत तुकारामांच्या भक्तीतून स्वराज्य उभे

संभाजीराजे म्हणाले, ‘‘संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास आम्हाला बोलावले याबद्दल मी आभार मानतो. संत तुकाराम महाराजांनी भक्ती दिली. या भक्तीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले.

शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना गुरुस्थानी मानले होते आणि तुकाराम महाराजांनी सांगितले, की जातीधर्माच्या पलीकडे जाऊन आपला समाज उभा राहिला पाहिजे.

म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज यांनीही हीच भूमिका ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याला पालखी सोहळ्यात पूजेचा मान मिळाला. आम्ही तुकोबांना अभिवादन करण्यासाठी येथे आलो आहे.’’

Advertisement

संसेदत मांडला होता प्रस्ताव

‘‘वारीला साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. या सोहळ्यात २० लाख लोक एकत्र येतात. ही गोष्ट अमूर्त वारसा हक्क यामध्ये नोंदविली जावी, यासाठी युनेस्कोमध्ये नोंद होण्यासाठी दोन वर्षे अगोदर मी संसदेत विषय मांडला होता.

या स्थळांची नोंद अमूर्त जागतिक वारसा हक्कमध्ये करावी, यासाठी मी प्रयत्न करणार आहे.’’अशी माहिती त्यांनी दिली.

 

Advertisement