ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

मुंबईतील ऐंशी टक्के नागरिक कोरोनाच्या संपर्कात

 मुंबईतील ८० टक्के लोकसंख्या कोरोनाच्या संपर्कात येऊन गेल्याची शक्यता टाटा मूलभूत संशोधन संस्थेने (टीआयएफआर) वर्तवली आहे. ‘टीआयएफआर’ ने असे ‘प्रोजेक्शन’ मांडले असले, तरी काळजी, सावधगिरी बाळगण्याचा ‘टीआयएफआर’ ने सल्ला दिला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आतापासूनच मुंबईत मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतली जात आहे. मोठी कोविड सेंटर्स बनवण्यात येत आहेत.

दुसऱ्या लाटेप्रमाणे तिसऱ्या लाटेचा फटका बसू नये, यासाठी आत्तापासूनच काळजी घेतली जात आहे.

या तिसऱ्या लाटेबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवले जात असतानाच, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चकडून एक चांगली सकारात्मक बातमी समोर आली आहे. ‘टीआयएफआर’ ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेइतकी मोठी नसेल.

वीस टक्के नागरिकांचे लसीकरण लवकर आवश्यक

मुंबईत ज्या २० टक्के नागरिकांना अजून कोरोना झालेला नाही, त्यांचे लसीकरण लवकर झाले, तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला नियंत्रणात ठेवता येईल, असे ‘टीआयएफआर’ च्या टेक्नोलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्स स्कूलचे डीन डॉ. संदीप जुनेजा म्हणाले.

दुसरी लस घेतल्यनंतर केवळ २७ जणांना बाधा

कोरोनाची पहिली लस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसकडे दुर्लक्ष करतात. कोरोनाचे दोन डोस घेण्याचे फायदे आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्यता अत्यंत कमी होते. मुंबई महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

लसीचे दोन डोस घेतलेल्यांचा कोरोनापासून बचाव होत असल्याचे समोर आले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या डोसचा परिणाम होतो; पण दुसऱ्या डोसचा त्याहीपेक्षा जास्त फायदा होतो.

मुंबई महापालिकेने एक जानेवारी ते १७ जून दरम्यान मुंबईतील २.९ लाख कोविड रुग्णांचे सर्वेक्षण केले. दुसरा डोस घेतल्यानंतर फक्त २६ जणांना कोरोनाची पुन्हा बाधा झाली, तर पहिला डोस घेतलेल्या दहा हजार पाचशे जण कोविडची बाधा झाली.

You might also like
2 li