नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजपाच्या (BJP) खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) हे काही दिवसांपू्र्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पुन्हा एकदा भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा देखील केला होता.

मात्र, आता एकनाथ खडसे आणि अमित शाह यांच्या भेटी बाबत एक मोठी बातमी समोर आली असून, राजकीय वर्तुळात एक चर्चा रंगली आहे. आणि ती म्हणजे.., अमित शाहांनी एकनाथ खडसे यांची भेटना कारली आहे.

दरम्यान, आता या प्रकारानंतर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. अमित शाहांशी माझी फोनवरून चर्चा झाल्याचं खडसेंनी सांगितलं.

तर दुसरीकडे भाजप नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांनी एक मोठं विधान केलं आहे. “तब्बल तीन तास वेटींगवर ठेवूनही अमित शाह यांनी खडसेंना वेळ दिला नाही, अमित शाह यांनी खडसेंची भेट घेतली नाही’. असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.

एकनाथ खडसे आणि रक्षाताई खडसे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. मात्र, त्यांची भेट झाली नाही. मी रक्षाताईंना फोन केल्यानंतर त्यांनीच मला ही माहिती दिली.’ असं महाजन म्हणाले. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवे मारण्याची धमकी दिलेल्या प्रकरणावरही महाजनांनी भाष्य केलं आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून खबरदारी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. सध्या मुख्यमंत्री ज्या पद्धतीने सार्वजनिक कार्यक्रमात वावरत आहेत, त्यामुळे त्यांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.’ असं ते म्हणाले.