पुणे : माझ्यामागे ईडी (ED) लावली तर मी सीडी लावेन असा इशारा एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी यापूर्वी अनेकवेळा दिलेला आहे. पुण्यामध्ये (Pune) बोलताना पुन्हा एकदा खडसे यांनी सीडीचे विधान केल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.

भाजपमधून (BJP) राष्ट्रवादीमध्ये (NCP) प्रवेश केल्यापासून एकनाथ खडसे यांनी आतापर्यंत अनेक वेळा सीडीचा उच्चार केलेला आहे. मात्र त्यांच्याकडे असलेल्या सीडीमध्ये नेमके काय आहे? ते अद्याप कोणालाही माहिती नाही.

पुण्यामध्ये बोलताना त्यांनी त्यांच्याविरोधातील आरोप तसेच ईडीची चौकशी याविषयीदेखील आपली भूमिका मांडली आहे. पुरावे न देता फक्त आरोप करायचे.

Advertisement

तुम्हाला पुरावे देऊन चौकशी करायला कोणी अडवले आहे का? भाजपातल्या नेत्यांची चौकशी होत नाही, जसे की ते स्वच्छ आहेत. हे चुकीचे आहे.

तसेच ओबीसी आरक्षण (OBC reservation) न मिळण्याला भाजप सरकार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) जबाबदार आहेत.

केंद्र सरकारने (Central Goverment) ओबीसींवर अन्याय केला आहे. वेळेवर इम्पेरिकल डेटा मिळाला असता राज्य सरकारला काही करता आले असते.

Advertisement

त्याचसोबत देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक पाहून नाटक करतात. अशी टीका एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस तसेच भाजपवर केली. यापूर्वीदेखील अनेक वेळा खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील शाब्दिक वाद पहायला मिळालेला आहे.