मुंबई – गोपाळकाला उत्सवात गोविंदा थर लावून हंडी फोडतात. आम्ही 50 थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना लगावला. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील टेंभी नाका उत्सवात जोरदार टोलेबाजी केली. स्टेजवर येताच यावेळचा गोविंदा जोरात आहे ना?, अशी साद त्यांनी गोविंदाला घातली.

शिंदे पुढे म्हणाले, गोविंदाचा विमा पण दिला, सरनाईक आणि लोकप्रतिनिधींनी खेळाच्या दर्जाची मागणी केली होत ती मान्य करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

यावेळी ते पुढे म्हणाले, गोविंदा थर लावून हंडी फोडतात मात्र आम्ही 50 थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना लगावला.

बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झालं असून असेच थर यापुढे वाढत जातील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा अनेक राजकीय नेत्यांनी समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देखील टोला लगावला आहे.

एकनाथ खडसे नेमकं काय? म्हणाले….

“एकनाथ शिंदे कधी काय बोलतील? याचा काही नेम नाहीये. त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ मला कळत नाही. 50 आमदारांना घेऊन दहीहंडी फोडली, म्हणजे नेमकं काय केलं?

शिवसेनेतून 50 आमदार फोडले आणि त्यांच्या मदतीने सरकार स्थापन केलं की भाजपासोबत गेले म्हणून सरकार स्थापन झालं. हे सर्व अर्थ न कळण्यासारखं आहे.

त्यामुळे नेमकं त्यांनी काय म्हटलं आहे, याचा अर्थ मला तरी निश्चितपणे समजलेला नाही”. असं खडसे (Eknath Khadse) म्हणाले, यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.