पुणे – गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. रोज एक नवीन राजकीय मुद्दा राज्यात नव्याने पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shide) यांच्या बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) अभूतपूर्व फूट पडली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला असून, एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. सध्या राज्यात शिंदे सरकार प्रस्तापित झाले आहे.

दरम्यान, ही उलथापालथ झाल्यानंतर आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आता शिवसेनेला (shivsena) वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट शक्तिप्रदर्शन करून राज्यात आपली पकड मजबूत करताना दिसून येत आहे.

होय.. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाचा विस्तार दिवसेंदिवस वाढतो आहे. मुंबईत आता 30 शाखा उघडण्यात आल्या आहेत. तर मुंबई महापालिका निवडणुकीआधी हा आवडा 150 वर नेण्याचा शिंदेगटाचा मानस आहे.

तर दादरमधील मध्यवर्ती कार्यालयाचं कामही अंतिम टप्प्यात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीआधी (Mumbai Mahapalika Election) शिंदेगटाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पुणे शहरात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाच्या शाखा लवकरच उघडणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता मुंबई प्रमाणे पुण्यात देखील शिंदे गटाची हवा पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, नुकतंच निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही गटांना धक्का बसला होता. त्यानंतर दोन्ही गटांना कोणती नावं आणि चिन्ह मिळतात,

याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अश्यातच निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मशाल हे चिन्ह दिल आहे, तर शिंदे गटाला ढाल तलवार हे नवं चिन्ह दिलं आहे.