मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती दिल्याप्रकरणी पोलिसांनी (police) एका तरुणाला अटक करुन त्याची चौकशीनंतर सुटका केली आहे. अविनाश अप्पा वाघमारे असं या तरुणाचं नाव असून, तो 36 वर्षांचा आहे. या तरुणाला पिंपरी-चिंचवडमधील (pimpri chinchwad) नाशिक फाटा येथून लोणावळा पोलिसांनी त्याबात घेतलं. दरम्यान, अविनाश अप्पा वाघमारे हा मूळचा घाटकोपर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकरनगरमधील साठे चाळीतील रहिवाशी आहे.

लोणावळ्यातील एका हॅाटेलमध्ये (lonavla hotel) रविवारी दुपारी वाघमारे हा जेवणासाठी आला होता. त्यावेळी त्याने हॅाटेलमध्ये दारु प्यायली. नंतर दारुच्या नशेतच त्याने पिण्याच्या पाण्याच्या बाटलीवरुन हॉटेल मालकाशी वाद घातला.

पाण्यावरुन झालेल्या वादातून हॉटेल चालकाला त्रास देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या 100 या आप्तकालीन क्रमांकावर फोन करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मारण्याचा कट रचला जात असल्याचा बनावट माहिती देणारा फोन अविनाशने केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला नाशिक फाट्यावरुन पकडून आणलं आणि त्याची चौकशी केली.

दरम्यान, आता या सर्व प्रकरणात स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “जीवे मारण्याची धमकी मिळील्यानंतर पोलिसांनी सुरक्षेची काळजी घेतली असून,

यापूर्वी देखील असे प्रयत्न झाले आहेत, मला काही अप्रुप नाही, अशा धमक्यांचा माझ्यावर परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, “असं अनेक वेळा पुर्वी देखील नक्षल तसेच देश विघातक शक्तींनी प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे असं काही नवीन नाही. मी जनतेमधला माणूस आहे आणि मला जनतेमध्ये जण्यापासून रोखू शकत नाही.

माझ्यावर धमक्यांता परिणाम झालेला नाही आणि होणार नाही. पोलिस विभाग याची काळजी घेतोय आणि अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.