मुंबई – स्वतःला ओरिजनल शिवसेना (shivsena) म्हणवून घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पाठिंबा देऊन अखेर कमळापुढे झुकत असल्याचे जाहीर केले आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. शिवसेनेतील बंडानंतर राज्यामध्ये होणारी ही पहिलीच मोठी निवडणूक असून शिंदे गटाने त्यांचा उमेदवार निवडणूकीच्या मैदानात का उतरवला नाही असा सवालही महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे.

स्वतःला शिवसेनेचे खरे कैवारी म्हणणाऱ्यांनी निवडणूक रिंगणातून अंग काढून घेत पराभवाच्या भीतीने उमेदवारीची माळ भाजपच्या गळ्यात टाकली असा आरोपही महेश तपासे यांनी यावेळी शिंदे गटावर केला.

ऋतुजा रमेश लटके यांचा मुंबई महापालिकेतील सेवेच्या राजीनामा हा देखील कोर्टाच्या वटहुकुमानंतर स्वीकारला जातो एवढ्या दडपशाहीचे राजकारण शिंदे – फडणवीस सरकार करत आहे.

महाराष्ट्रातील व देशातील भारतीय लोकशाहीवर व राज्यघटनेवर विश्वास ठेवणारी जनता हे पाहत असून या सर्वांचा निवडणुकींच्या माध्यमातून व कायद्याच्या माध्यमातून लवकरच निपटारा होईल अशी अपेक्षा महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे.

दोन्ही गटाला नवीन चिन्ह आणि नावं देण्यात आलं….

निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला नवीन चिन्ह आणि नावं दिली आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेबत ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Tthackeray) हे नाव दिलं आहे.

तर, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं. ठाकरे गटाला मशाल (mashal symbol) हे चिन्ह दिल्यानंतर शिंदे गटाला ढाल तलवार हे नवं चिन्ह दिलं आहे.