पुणे – महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री ‘एकनाथ शिंदे’ (eknath shinde) यांची काल प्रकृती (helath) बिघडली आहे. 30 जूनला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला होता. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते सतत दौरे, सभा, कार्यक्रम करत आहे. आणि यामुळेच त्यांना थकवा जाणवत असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना डॉक्टरांनी सक्त विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांचे सतत दिल्ली दौरे सुरु आहेत. याशिवाय महाराष्ट्र दौरा, उद्धाटनाचे कार्यक्रम, सत्कार समारंभ, जाहीर सभा, बैठका यामध्ये एकनाथ शिंदे सतत व्यस्त होते.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीसंदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरसर (deepak kesarkar) यांनी पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर माहिती देताना मुख्यमंत्री मागील काही दिवसांपासून सातत्याने दौऱ्यावर असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नसून

Advertisement

त्यामुळे त्यांना त्रास झाल्याचं स्पष्ट केलंय. आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून त्यांच्या प्रकृतीसंदर्भात वाटणाऱ्या चिंतेबद्दलही मी त्यांना कळवलं असल्याचं केसरकर यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीसंदर्भात काय अपडेट्स आहेत?

असं पत्रकारांनी केसरकरांना पत्रकार परिषदेमध्ये विचारलं. यावर उत्तर देताना केसरकर (deepak kesarkar) यांनी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती दिली.

Advertisement

‘मी जेव्हा त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा मुख्यमंत्र्यांची नियमित आरोग्य तपासणी सुरु होती. ते आजारी नाहीत. मात्र त्यांनी स्वत:ची फार दगदग करुन घेतली आहे.’ असं केसरकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना थकव्यामुळे विश्रांतीचा सल्ल डॉक्टरांनी दिल्याची माहिती समोर आली असून केसरकारांनी या थकव्या मागील कारण हे अपुरी झोप असल्याचं सांगितलं.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची प्रकृती बिघडली असल्यामुळे सर्व प्रशासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

Advertisement