पुणे – पुणे शहरातील (pune) वाहतूक कोंडी (traffic) ही दिवसागणित वाढतच चाली असून, सामान्य पुणेकर चांगलेच हैराण झाले आहेत. शहरातील सर्वच ठिकाणी गेल्या काही दिवसापासून पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पुण्यातील चांदणी चौकात तर तासन् तास वाहनांच्या (traffic) रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे चांदणी चौकातील (Chandani Chowk Pune) ही वाहतूक कोंडी कधी फुटणार असा सवाल पुणेकरांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विचारला आहे.

झालं असं की., नुकतंच (27 ऑगस्ट) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्याचीचांदणी चौकातील (Chandani Chowk Pune) हायवेवरुन साताऱ्याला जात होते. त्यावेळी चांदणी चौकात मुख्यमंत्र्यांचा (Eknath Shinde) ताफादेखील वाहतूक कोंडीत अडकला.

शहरात सर्व ठिकाणी वाहतूक कोंडीची (traffic) समस्या निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्याची चांदणी चौकात ताफा अडकल्यानंतर पुणेकरांनी त्यांना गाठलं.

गेल्या दोन वर्षांच्या कोंडीबाबतची माहिती दिली. तुमची तर अवघ्या पंधरा मिनिटांत सुटका झाली पण आमचं काय? आम्ही या वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास कधी घेणार असा प्रश्न त्यांना विचारला.

मात्र, आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ताफा अडकल्यानंतर प्रशासनाने या चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केलीये.

याचाच भाग म्हणून मुंबई- बंगळुरु महामार्गावरील चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त केला जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तसं जाहीर केलंय.

12 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान हा पूल पाडला जाईल. हे काम सुरू करण्यापूर्वी वाहतुकीतील बदल जाहीर केले जातील. असं सांगण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या (Eknath Shinde) आदेशानंतर पुण्यातल्या संबंधित अधिकाऱ्यांनी सकाळी चांदणी चौकात (Chandani Chowk Pune) भेट दिली. वाहतूक कोंडीची कारणं, वाहतुकीच्या समस्या याबाबत यावेळी त्यांनी माहिती करुन घेतली.