मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे ठाण्यामध्ये वाढदिवसाचे औचित्य साधून भावी मुख्यमंत्री (Future CM) म्हणून पोस्टर  (Poster) लावण्यात आले आहेत. त्यामुळे राजकारणात वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार जेव्हा स्थापन झाली तेव्हा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये एकनाथ शिंदे यांचे देखील नाव होते.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आजारी पडल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार अशी देखील चर्चा रंगल्याचे आपण सर्वानी पहिले आहे.

Advertisement

आता तर एकनाथ शिंदे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून ठाण्यात पोस्टर (Poster) देखील लावण्यात आले आहेत. 9 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असतो त्यामुळे वाढदिवसाचे पोस्टर ठाण्यात लावण्यात आले आहेत.

याच एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवर भावी मुख्यमंत्री असे लिहण्यात आले आहे, त्यामुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट भागात हे पोस्टर लावण्यात आले आहेत.

या पोस्टरमध्ये नगरविकास मंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून देखील उल्लेख करण्यात आला आहे.

Advertisement

नगरविकास मंत्री (Minister for Urban Development) एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मतदार संघात प्रचंड लोकप्रियता आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर लावले आहेत. याच पोस्टर्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.