मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) अभूतपूर्व फूट पडली आहे. त्यामुळे आता शिवसेनेत दोन वेगळे गट पाहायला मिळत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला पक्षात झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अनेक प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

मात्र, अश्यातच पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गुवाहाटीला (guwahati)जाणाच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे शिंदे यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदारही गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे पुढील आठवड्यात निघण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला कामाख्या देवीच्या (kamakhya devi) दर्शनाला जाणार आहे. सर्व आमदार सोबत घेऊन शिंदे पुन्हा गुवाहाटी येथे जाणार आहे.

दौऱ्याची तारीख निश्चित नसली तरी पुढचा आठवड्यात दौरा होण्याची शक्यता आहे. या दौऱ्याची तयारी करण्यासाठी काही पदाधिकारी देखील गुवाहाटीला रवाना झाले आहेत.

या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहटीचे मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलीस कमिशनर अशा महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणार आहेत. सत्तांतराच्या काळात शिंदे यांना ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांना भेटणार आहेत. तसेच, कामाख्या देवीच्या (kamakhya devi) मंदिरात विशेष पूजा देखील करणार आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकी नंतर शिवसेनेला (shivsena) मोठा धक्का बसला. आणि त्यानंतर शिवसेनेचे महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्षाचे जवळपास 40 हून अधिक आमदार सोबत घेऊन गुवाहाटीला रवाना झाले होते.

आणि त्या दिवसापासूनच महाराष्ट्रात या राजकीय नाट्याला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. निकालानंतर एकनाथ शिंदे अचानक नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेत राजकीय भूकंप झाला. हे सर्व आमदार गुवाहाटीच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले होते. शिंदे गटाच्या या सर्व आमदारांचा गुवाहाटी दौरा चांगलाच गाजला होता.