मुंबई – पुण्यात पीएफआयच्या (Bann PFI) आंदोलनतील पाकिस्तान जिंदाबाद घोषणेचा मुद्दा चांगलाच तापू लागलाय. पीएफआयच्या आंदोलनाच्या आयोजकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बंडगार्डन पोलिसांनी आरोपींविरोधातली अनेक कलमं वाढवली आहेत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हा मुद्दा चांगलाच तापला असल्याचे दिसून येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. अश्यातच राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath Shinde) यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी ते बुधवारी नाशिक मध्ये बोलत होते.

एकनाथ शिंदे (CM eknath Shinde) म्हणाले, “पीएफआयसारख्या (PFI) देश विघातक संघटना आहेत, त्यांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार असून,

पीएफआय संघटेनवर बंदी (Bann PFI) घातली ती योग्य असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath Shinde) यांनी व्यक्त केलं आहे. शिवाय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलेल्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, “या राज्यात, देशात कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणं खपवून घेतलं जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे”. अशी माहिती एकनाथ शिंदेंनी (CM eknath Shinde) दिली.

दरम्यान, पाकिस्तान जिंदाबाद नाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी आता याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातच याविषयीचे कलम ऍड करण्यात आलं आहे.

कलम 153, 109, 120 ब ही आरोपींविरुद्ध नव्याने ऍड करण्यात आली आहेत. यातलं कलम 153 सरकारी कामात अडथळा आणणे, कलम 109 चिथावणीखोर वक्तव्य करणे, कलम 120 ब कट तयार करणे, अशा कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.