राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करण्याची मागणी सर्वंच राजकीय पक्षांनी लावून धरली आहे. आता त्यात देवेंद्र फडणवीस यांनीही आक्रमकता धारण केली आहे.

महाविकास आघाडीचा नाकर्तेपणा

या निवडणुका रद्द करण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे. जर या निवडणुका रद्द करण्यात आल्या नाहीत, तर राज्यात भाजप उग्र आंदोलन करेल, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण हे महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे गेलेले असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. त्यानंतर सरकारने केवळ आश्वासन देण्याचे काम केले.

ओबीसींचा विश्वासघात

ओबीसींच्या नेत्यांनी निवडणुका होऊ देणार नाही असे जाहीर केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या जातात, हा ओबीसी समाजाचा विश्वासघात असल्याची घणाघाची टीका फडणवीस यांनी केली आहे.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत असल्याचे ते म्हणाले.