निवडणूक आयाेगाने मंगळवारी मध्य प्रदेशातील खंडवासह लाेकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या ३० जागांसाठी पाेटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
या जागा १४ राज्यांतील आहेत. या सर्व जागांसाठी ३० अाॅक्टाेबर राेजी मतदान घेतले जाईल. मतमोजणी २ नोव्हेंबर रोजी केली जाणार आहे.
लोकसभेच्या ज्या तीन जागांसाठी मतदान घेतले जाणार आहे, त्या जागा खासदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आहेत.
यात खंडवा आणि मंडी लोकसभा मतदारसंघांतून अनुक्रमे भाजप खासदार नंदकुमारसिंह चौहान आणि रामस्वरूप शर्मा हे निवडून गेले होते.
तर दादरा आणि नगरहवेलीतून अपक्ष मोहन डेलकर निवडून गेले होते. या तिन्ही खासदारांच्या मृत्यूमुळे या जागा रिक्त झाल्या होत्या.
यातील मोहन डेलकर हे याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील एका हॉटेलमध्ये मृत आढळले होते.
विधानसभेच्या कुठे किती रिक्त जागा
आसाममध्ये ५, पश्चिम बंगाल ४, मध्य प्रदेश- ३, हिमाचल प्रदेश- ३,
मेघालय- ३, बिहार- २, कर्नाटक- २ आणि राजस्थान, आंध्र प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, मिझोरम,
नगालँडमध्ये प्रत्येकी एक विधानसभा सदस्याची जागा रिक्त आहे.