अँटिलिया’ निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) अटक केली आहे.

लोणावळ्यातील रिसॉर्टमधून त्यांना बुधवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सकाळी शर्मांच्या अंधेरी परिसरातील घरावर आणि त्यांच्या कार्यालयावर छापे टाकले. तब्बल सहा तास एनआयएने शोधमोहीम राबवल्यानंतर प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणात कट रचणे आणि पुरावे नष्ट केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. लोणावळ्यातील मोठ्या रिसॉर्टमधून प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली. दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांना कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.

Advertisement

त्याआधी त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाईल. मनसुख हिरण यांच्या हत्येचा मास्टरमाईंड प्रदीप शर्मा होते, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांकडून मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अटकेत असलेल्या विनायक शिंदे, संतोष शेलार आणि आनंद यादव यांच्यासह आणखी दोघांनी मनसुख हिरण यांचं अपहरण करुन त्यांची हत्या केली.

त्यानंतर मृतदेह रेतीबंदर खाडीत टाकला. हे सगळे प्रदीप शर्मा यांच्या जवळचे आहेत. प्रदीप शर्मा यांनी त्यांना पैसे आणि गाडी दिली. प्रदीप शर्माने या सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या.

Advertisement