माजी गृहमंत्री अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यानंतर आता ऊर्जामंत्री डाॅ नितीन राऊत ईडीच्या रडारवर आले आहेत. त्यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार दाखल झाली आहे.

गैरव्यवहाराचा आरोप

डॉ. राऊत यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार करण्यात आली आहे. शहरातील वकील तरुण परमार यांनी ही तक्रार केली असून अधिकाऱ्यांच्या संगनमताने गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

परमार यांनीच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातदेखील तक्रार केली होती. या वेळी त्यांनी अनिल देशमुख, नागपुरातील एक मंत्री, त्यांचे सचिव आणि अन्य मोठ्या अधिकाऱ्यांचा मनी लाँडरींग प्रकरणामध्ये सहभाग असल्याचे म्हटले होते.

Advertisement

पुरावे असल्याचा दावा

तरुण परमार हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी गेले होते. या वेळी त्यांच्या हातामध्ये कागदपत्रेदेखील होते. या वेळी त्यांनी देशमुख यांच्यासोबत आणखी काही नेत्यांविरोधात मनी लाँडरींगच्या प्रकरणामध्ये पुरावे असल्याचा दावा त्यांनी ईडीकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे. याचवेळी त्यांनी डॉ. राऊत यांची तक्रार केली असावी, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

राऊत यांच्या अडचणीत वाढ

देशमुखांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या वकिलांची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये मनी लाँडरींग प्रकरणात पुरावे असल्याचा दावा या वकिलांनी केला आहे. त्यामुळे आता अनिल देशमुखांसह डॉ. नितीन राऊतांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

 

Advertisement