Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

काॅपी करण्यात अभियांत्रिकीचे विद्यार्थी आघाडीवर

विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन असताना त्याच गैरप्रकार वाढले आहेत. त्यातही काॅपी करण्यात अभियांत्रिकीचे विद्यार्थी आघाडीवर आहेत.

तांत्रिक ज्ञान असलेले विद्यार्थी तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेऊन परीक्षेत गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आले आहे.

साडेतीनशे विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार

प्रथम सत्राच्या ऑनलाइन परीक्षेत ३५० विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आले होते. त्यांना चौकशीसाठी बोलावले असता त्यातील बहुतेक विद्यार्थी अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाशी निगडित विद्याशाखेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

टेक्नोसॅव्ही असलेल्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा असा गैरवापर करणे धक्कादायक असून, अशा विद्यार्थ्यांवर आम्ही कडक कारवाई करत आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर यांनी दिली आहे.

संशयास्पद हालचाली

विद्यापीठाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन परीक्षा घ्यावी लागत आहे. एप्रिल-मे महिन्यात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्राची परीक्षा घेताना त्यात प्रोक्टॅर्ड पद्धतीचा वापर विद्यापीठाने सुरू केला.

विद्यार्थ्यांना मोबाईल, लॅपटॉप, टॅबचा फ्रंट कॅमेरा सुरू ठेवून परीक्षा द्यावी लागली. त्यामध्ये मोबाईलमध्ये दुसरी विंडो सुरू केली, इंटरनेट बंद केले किंवा संशयास्पद हालचाली केल्यास त्यास इशारा दिला जात होता.

Advertisement

वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा आपोआप बंद होत असल्याने त्यावर गैरप्रकार केल्याची कारवाई केली जात आहे.

परीक्षेतील तांत्रिक प्रश्न कमी

परीक्षा पद्धती कडक केल्याने परीक्षेतील तांत्रिक प्रश्न देखील कमी झाले आहेत. १२ जुलै पासून विद्यापीठाची द्वितीय सत्र परीक्षा सुरू झाली आहे. यामध्ये २८४ अभ्यासक्रमाचे ६ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

या वेळी परीक्षा हाॅलमध्ये कॅमेरा आहे; पण त्याचसोबत व्हाइस रेकॉर्डिंग केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि इतर कोणाचा परीक्षेसंदर्भातील संवाद रेकॉर्ड झाल्यास कॉपी पकडली जात आहे.

Advertisement

विद्यापीठाला संभाव्या कॉपी पद्धती लक्षात आल्या असून, विद्यार्थ्यांनीही या गैरप्रकारात अडकू नये असे आवाहन डॉ.चासकर यांनी केले आहे.

ऑनलाइन ग्रुपचा वापर

कॉपी करताना सुसूत्रता यावी, म्हणून काही लोकांनी चक्क विद्यापीठाच्याच नावाने विविध समाजमाध्यमांवर ग्रुप केले आहे. ज्याची विभागणी एसपीपीयू, डिपार्टमेंट आणि विषयाच्या नावानुसार केली आहे.

प्रश्नपत्रिकेचा स्क्रीनशॉट काढून संबंधित ग्रुपवर टाकला जातो. त्यानंतर ग्रुपवरील सदस्य त्याची उत्तरे देतात; मात्र हे करत असताना विद्यार्थ्याच्या हालचाली, मोबाईल किंवा लॅपटॉपवरील विंडोबदल टिपला जातो आणि विद्यार्थी पकडले जातात.

Advertisement
Leave a comment