Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

‘या’ अभिनेत्रीच्या उद्योजक पतीला अटक

एका अश्लील चित्रपटाच्या चित्रिकरणावरून बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. दिवसभर चाैकशी करून, नंतर त्यांना अटक करण्यात आली.

कुंद्रा विरोधात पुरेसे पुरावे

पोलिसांच्या पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना चौकशीसाठी बोलावले होतं. एका प्रकरणात राज कुंद्रा यांचं नाव समोर आलं होतं.

अश्लील चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत फेब्रुवारीमध्ये एक तक्रार दाखल करण्यात आली होता. एका अभिनेत्रीलाही पोलिसांनी अटक केली होती.

Advertisement

चित्रपट बनवणाऱ्या अनेक लोकांची चौकशी करण्यात आली होती. आज कुंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं.

सुमारे 7 ते 8 तास चौकशी झाल्यानंतर संध्याकाळी अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा विरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळे राज कुंद्रा यांना अटक झाल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

कुंद्रा यांच्या विरोधात यापूर्वीही तक्रार

यापूर्वी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध एका उद्योगपतीने मार्च 2020 मध्ये तक्रार केली होती. मुंबईतील एक नॉन-रेसिडेन्शिअल इंडियन उद्योगपती सचिन जे. जोशी यांनी पोलिसात तक्रारीत केली होती.

Advertisement

हे प्रकरण सोन्याचा व्यापार करणारी कंपनी ‘सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड’शी (एसजीपीएल) संबंधित होतं. कुंद्रा हे यापूर्वी या कंपनीचे संचालक होते.

मुंबईतील खार पोलिस ठाण्यात जोशी यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा, गणपती चौधरी, मोहम्मद सैफीसह एसजीपीएलच्या इतर अधिकाऱ्यांवर फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.

देवाण-घेवाणीवरून वाद

उद्योगपती सचिन जोशी आणि राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी यांच्यात 2014 रोजी देवाण-घेवाणीवरून वाद झाला होता.

Advertisement

15 दिवसांपूर्वी जोशी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती समोर येत आहे. “मला लालच देऊन माझी फसवणूक केली आहे.

2014 रोजी सुरू करण्यात आलेल्या एसजीपीएलची सतयुग गोल्ड स्कीमद्वारे फसवणूक केली आहे,” असा आरोप जोशी यांनी केला होता.

अंडरवर्ल्डशी संबंधाचा आरोप

यापूर्वीही शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा अनेक वादात सापडले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची यांच्यासोबत राज कुंद्राचे आर्थिक संबंध असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला आहे. ईडीने यासंबंधी कुंद्रा यांना नोटीसही दिली होती; पण कुंद्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते.

Advertisement

 

Leave a comment