कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन सर्व स्तरावर प्रयत्न करीत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता पुण्यात शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाउन सुरू आहे. त्यात बदल करण्यात आला आहे.

सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू

पुण्यात शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. आता शनिवारी व रविवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.

Advertisement

पुणेकरांना मोठा दिलासा

पुण्यात आज २९ मे पासून हा बदल लागू केला जाणार आहे. पुण्यात शनिवारी आणि रविवारीसह सर्व दिवस सकाळी ७ ते ११ दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यातील कोरोना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण कमी झाले आहे.

पॉझिटिव्हिटीचे प्रमाण ११.९ टक्के

Advertisement

राज्यात केवळ आणि केवळ पुण्यामध्येच दर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येत होत्या. कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने लोकप्रतिनिधींकडून शनिवारी आणि रविवारी पुण्यात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याबाबतची मागणी होत होती. सध्या पुण्यात कोरोना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण हे ११.९ टक्के आहे.

सरकारी यंत्रणांनी चांगली कामगिरी केली

पुण्यातील सर्वच सरकारी यंत्रणांनी चांगली कामगिरी केली आहे. आगामी काळात हे प्रमाण आणखी खाली येण्याचा अंदाज असल्याचा दावादेखील टोपे यांनी केला आहे. ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या पॉझिटिव्हिटीचे प्रमाण जास्त आहे तिथे मात्र १५ जूनपर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे.

Advertisement

स्थिती पाहूनच तेथे शिथिलता

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहूनच तेथे शिथिलता देण्यात येणार आहे. त्याबाबतचे सर्व आदेश १ जून रोजी किंवा त्यापूर्वी काढले जातील, असेदेखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

Advertisement