इथेनॉल बेस्ड व्हेईकल्सदेखील लाँच करण्याचा सरकार विचार करीत आहे. सरकारने आता इथेनॉल बेस्ड ‘फ्लेक्स इंजिन’ला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यासाठी जीवाश्म इंधन वापरण्याऐवजी स्थानिक कृषी उत्पादनांचा वापर केला जातो.

ब्राझील, अमेरिकेचे अनुकरण

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल बेस्ड प्रोडक्ट लाँच करण्याबाबत निवेदन देताना सांगितले, की ही योजना येत्या तीन महिन्यांत सुरू केली जाईल.

ब्राझील, अमेरिका आणि कॅनडासारख्या जगातील अनेक देशांमध्ये फ्लेक्स इंजिन उपबल्ध आहेत, जी कृषी उत्पादनांवर (फार्म प्रोड्यूस) चालतात.

Advertisement

बीएमडब्ल्यू, मर्सिडीज आणि टोयोटासारख्या कंपन्या पर्यायी इंधनावर धावणाऱ्या वाहनांच्या विकासास प्रोत्साहनही देत आहेत.

इंधन खर्चात बचत

पर्यायी इंधन इथेनॉलची किंमत प्रति लीटर 60-62 रुपये इतकी आहे, तर देशाच्या अनेक भागांत पेट्रोलची किंमत शंभर रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे इथेनॉल वापरून भारतीयांना प्रतिलीटर 30 ते 35 रुपयांची बचत करता येईल.

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याचे लक्ष्य

पुढील दोन वर्षांत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. त्यामुळे देशाला महाग तेलाच्या आयातीवरील अवलंबन कमी करण्यास मदत होईल.

Advertisement

केंद्र सरकारने 2025 पर्यंत हे लक्ष्य साध्य करण्याचे ठरवले होते; परंतु आता सरकारने निर्णय बदलला आहे. सरकारला हे लक्ष्य आता 2023 पूर्वी साध्य करायचे आहे.