Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

मोदींच्या भेटीनंतरही जीएसटीबाबत पुसली तोंडाला पाने

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आरक्षणासह १२प प्रश्न मांडले होते.

त्यात थकीत जीएसटीचाही समावेश होता; परंतु केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

चार हजार कोटींवर बोळवण

पंतप्रधानांसोबत चर्चा करूनही त्याचा फारसा फायदा झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या वर्षभराची आणि या वर्षातील दोन महिन्यांची मिळून जीएसटी परताव्यापोटीची जवळपास ३३ हजार कोटी रुपयांची थकबाकी असताना,

केवळ चार हजार कोटी रुपये केंद्राने राज्याच्या झोळीत टाकले आहेत. वेतन आणि पेन्शन यापोटी राज्य सरकारला महिन्याला सुमारे १२ हजार कोटी रुपये मोजावे लागत असताना,

आर्थिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला चार हजार कोटी रुपयांचा निधी तुटपुंजा असल्याची प्रतिक्रिया राज्याच्या प्रशासनातून उमटत आहे.

३३ हजार कोटी रुपयांची थकबाकी

राज्याला २०२०-२१ या आर्थिक वर्षात केंद्राकडून २४ हजार ३०६ कोटी रुपयांची रक्कम जीएसटी भरपाईपोटी मिळणे बाकी होते.

या वर्षातील एप्रिल आणि मे महिन्यांचे आणखी नऊ हजार कोटी रुपये असे सर्व मिळून ३३ हजार ३०६ कोटी रुपयांची थकबाकी होती.

या पार्श्वभूमीवर, ठाकरे यांनी नवी दिल्लीत मोदी यांची राज्याच्या विविध प्रश्नांवर भेट घेतली होती. त्या वेळी जीएसटीची थकबाकी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जीएसटी परिषदेत परताव्याचा मुद्दा वारंवार उपस्थित केला होता. याशिवाय राज्य सरकारने केंद्राशी अनेकदा पत्रव्यवहार केला होता.

Leave a comment