आज राज्यात कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरली आहे. सरकार कोरोनावर उपचार करण्यासोबतच लसीकरणावर देखील भर देत आहे.

मात्र या लसीचे दोन डोस घेऊन देखील अनेकांना कोरोनाची बाधा होत आहे. यात सर्वसामान्यांसह राजकीय पुढारी देखील आहेत.

नुकतीच पुणे जिल्ह्यातील खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भिमराव तापकीर यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Advertisement

दोन दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यात  त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

त्यांना घरीच अलगीकरण करण्यात आले असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे .

दरम्यान तापकीर यांनी यापूर्वी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र तरीही त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

Advertisement

आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र तापकीर यांना कोरोना झाल्याने ते पावसाळी अधिवेशनाला जाऊ शकणार नाहीत.

मात्र लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले तरीदेखील कोरोना होत असल्याचे अनेक प्रकरण समोर आल्याने सर्वसामान्य कोड्यात पडले आहेत.

Advertisement