मुंबई : राज्यातले घोटाळे बाहेर काढताना माझे हात पाय तोडले तरी मी लढत राहणार असे भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लबोल केला आहे.

किरीट सोमय्या यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सवाल केला की, ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना तुरुंगात दाखल करणार का? जे हॉस्पिटल ब्लॅकलिस्ट केले आहेत. त्यात दाखल करणार का? हातपाय तोडले तरी किरीट सोमय्या लढत राहणार आहे.

मी राज्याला घोटाळेमुक्त करणार, आतापर्यंत मला 14 नोटीसा आल्या. नोटीसा येणे आता नवे राहिले नाही. सगळेच नोटीसा काढतात. नंतर हेच नोटीसा काढणारे तुरुंगात (jail) जातात, असा टोमणाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

Advertisement

तसेच पुढे त्यांनी सांगितले की, सुजित पाटकर (Sujit Patkar) आणि राजीव साळूंखेंचे (Rajiv Salunkhe) काय संबंध आहेत हे संजय राऊतांच्या मुलींना सांगू द्या. संयुक्तपणे जमिनी खरेदी केल्या आहेत.

राजीव साळुंखेंचे वार्षिक उत्पन्न 70 हजार आहे आणि त्यांना 100 कोटींचे टेंडर मिळाले. कोव्हिड घोटाळ्यांना आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, सुजित पाटकर जबाबदार आहेत.

ही कंपनी केव्हा तयार झाली, उलाढाल किती, स्टाफ किती, खोटे पुरावे सादर करून राज्यात लोकांची हत्या केली, अशी टीकाही त्यांनी केली.तसेच कोविड घोटाळा बाहेर येतोय त्यामुळे ठाकरे घाबरले असल्याचे विधान किरीट सोमय्या यांनी केले आहे.

Advertisement