मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा मुलगा नील सोमय्या (Neel Somaiya) याच्यावर केलेल्या आरोपावरून किरीट सोमय्या यांनी नरमती भूमिका घेतल्याचे दिसत आहे. तसेच त्यांनी संजय राऊत यांना टोलाही लगावला आहे.

संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात (Shivsena Bhawan) पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी सुधीर मुनगंटीवार, मोहित कंबोज, नील सोमय्या, आणि किरीट सोमय्या यांच्यावर आरोपांची फायरिंग केली आहे.

यावरून किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मुलाच्या प्रश्नावर सोमय्या यांनी नरमती भूमिका घेतल्याचे दिसत आहे. यावेळी ते म्हणाले, ४०० कोटीला मारा गोळी, तो छोटा प्रोजेक्ट आहे.

Advertisement

नील ज्या कंपनीत आहे, तो एक दोन वर्षांपूर्वी त्या कंपनीशी जोडला गेला. तो तर अगदी छोटा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला नील आणि किरीटला जेलमध्ये टाकायचे आहे.

चला मी येतो.. खोल्या सॅनिटाईज (Sanitize) नसतील तरी चालतील.. पोलिसात तक्रार करायला गेलो, तर तुमचे गुंड आले.. मी कागद देतोय ना अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, आम्ही त्या बँकेतून (Bank) एक पैसासुद्धा घेतलेला नाही. ज्या फ्रंटमॅनबद्दल राऊत बोलतायत तो कोणाचा माणूस आहे ते येत्या काही दिवसात समोर येईल.

Advertisement

राकेश वाधवान किंवा पीएमसी (PMC) घोटाळा याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. हे मी पुन्हा एकदा सांगतो. उलट पीएमसी घोटाळा मीच बाहेर काढला असेही किरीट सोमय्या म्हणाले आहेत.