मुंबई : भाजपचे (BJP) नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील नेत्यांना इशारा दिला आहे. सगळे शेवटी चक्की पिसणार आहेत असे म्हणत पाटील यांनी टीका केली आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील आरोपानंतर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसैनिकांनी पुण्यात (Pune) धक्काबुक्की केली आहे. त्यानंतर राज्यातले राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचे टीका सत्र सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, सुपातले जात्यात जात आहेत, आधीच्याच पीठ झालंय आणि सगळे शेवटी चक्की पिसणार आहेत असे म्हणत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना इशारा दिल्याचे दिसत आहे.

Advertisement

हे तोडपाणी करणारे सरकार आहे का? गृहमंत्री जेलमध्ये आहे, चाललंय काय, सिताराम कुंटे यांनी आरोप केला आहे, अनिल देशमुख मला चिठ्ठी पाठवयचे, आता देशमुख म्हणतात, अशी चिठ्ठी अनिल परब (Anil Parab) पाठवायचे.

‘बदल्यांमध्ये मविआचा हात पकडू शकत नाही’, हे आम्ही नाही अनिल देशमुख म्हणत आहेत. असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) वाटलं की लगेच जामीन मिळेल, पण तसं झालं नाही, ठाकरे कुटुंबियांवरही आरोप झाले, पण इतकी वाईट परिस्थिती स्थिती आली नाही की किरीट सोमय्यांवर हल्ला करावा !

Advertisement

केंद्राची सिक्युरीटी असताना, सोमय्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. रोज उठून प्रेसला धमक्या, आम्ही दादा आहोत, मुंबई आमची आहे, नवाब मलिकांच्या जावयांपासून ते शाहरुख खानपर्यंत (Shahrukh Khan) अशी प्रकरणे बरीच झाली ना?

पण तिथे पोलिस, कोर्टाचा सहारा घेतला. पण किरीट सोमय्यांना थेट जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय. आता तुम्हालाही असे वाटत असेल, तर सोमय्या, फडणवीस, पाटील एजन्सीचा दुरुपयोग करतायत तर तुम्हालाही कोर्टात जायचा अधिकार आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Advertisement