मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्यांच्या मित्रपरिवाराने जम्बो कोविड सेंटरमध्ये (Jambo Kovid Center) १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करत आहेत. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

किरीट सोमय्या यांनी संजय राऊत हे जेलमध्ये जातील. अनिल देशमुखांच्या शेजारच्या खोल्या सॅनिटाईझ करून ठेवाव्यात असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

किरीट सोमय्यांच्या या आरोपांना संजय राऊत यांनी जोरदार उत्तर दिले आहे. उद्या शिवसेना भवनात शिवसेनची (shivsena) पत्रकार परिषद होणार आहे. मी या पत्रकार परिषदेत असेलच पण शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या पत्रकार परिषदेत असतील.

Advertisement

शिवसेना आणि ठाकरे परिवारांवर जो काही चिखल उडवला जात आहे त्याला आम्ही उत्तर देऊ. हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल असे ते सांगत आहेत. अनिल देशमुखांच्या (Anil deshmukh) बाजूच्या कोठडीत जातील असेही वारंवार सांगितले जात आहे.

पण तुम्हाला सांगतो, भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्याच बाजूच्या कोठडीत जाणार आहेत. देशमुख बाहेर असतील आणि भाजपचे लोक आत असतील. आय रिपीट. आता बस्स झाले. राजकीय मर्यादांचे उल्लंघन तुम्ही केले आहे.

आता तुम्हाला कळेल काय असते ते. हमाम में सब नंगे होते है, असे म्हणत संजय राऊत चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले आहेत. भाजपचे कोण साडेतीन लोक जेलमध्ये जाणार याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Advertisement