हिमाचल प्रदेशमध्ये टाटा नेक्सॉनचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ही गाडी रस्त्यावरील ब्लॅक आईस वरून घसरल्याने 200 फूट दरीत कोसळली आहे.
परंतु या कारमध्ये असलेले दोघे जण सुखरूप असून त्यांना किरकोळ जखमा झालेल्या आहेत. Tata Nexon ही भारतातील पहिली अशी कार आहे, जिला ग्लोबल ५-स्टार सेफ्टी रेटिंग दिलेली आहे.
सुरक्षेततेसाठी या कारने 17 पैकी एकूण 16.7 गुण मिळवले आहेत. Tata Nexon ही एक मेड इन इंडिया कार म्हणून ओळखली जाते . याआधी देखील टाटा कंपनीच्या पंच मायक्रो कारचा ही मोठा अपघात झाला होता.
परंतु त्या कारमध्ये असलेले सर्व प्रवासी सुखरूप वाचले होते. या कारमध्ये एअरबॅग्स व सीटबेल्ट्स रिमाइंडर सारखी वैशिष्ट्ये असल्यामुळे आतील प्रवाशांना इजा होत नाही.
या अपघातात 200 फूट दरीत कोसळलेली कार क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आलेली आहे. परंतु या अपघातानंतर टाटा कंपनीचे भारतीयांना फाइव्ह स्टार सेफ्टी काय असते हे दाखवून दिले आहे.
या कारच्या लॉन्चिंगवेळी ग्लोबल एनकॅपचे सीईओ भारतात आले होते. यामध्ये त्यांनी मारुतीला आव्हान दिले होते. मात्र मारुती कंपनीला आजपर्यंत फाइव स्टार रेटिंगची एकही कार बनवता आलेली नाही.
परंतु टाटाने अशा तीन सेफ्टी कार बनवल्या आहेत. या अपघातात या कारने पाच वेळा पलटी मारली आहे. तरीही कारचे जास्त प्रमाणात नुकसान झाले नाही. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर निखिल राणा याने शेअर केला आहे.