ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

माजी सैनिकांना मिळकत करात सवलत

पुणे : देशाचे संरक्षण करणा-यांच्या बाबतीत आदर असतोच. त्याचबरोबर त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत असतात. पुणे महापालिकेनेही त्यांना मिळकत कर माफी जाहीर केली आहे.

सवलतीऐवजी पूर्णमाफी

शहरातील माजी सैनिक, हुतात्म्यांच्या पत्नी तसेच शौर्यपदक विजेते माजी सैनिक यांच्या कुटुंबीयांना मिळकत करात १०० टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव आज महापालिकेच्या मुख्य सभेत एकमताने मान्य करण्यात आला.

महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या पत्नी, हुतात्म्यांच्या पत्नी, संरक्षण दलातील शौर्यपदक विजेते सैनिक यांना सर्वसाधारण मिळकत करात सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करून मुख्य सभेकडे पाठवला होता. त्यानुसार आज तो मुख्य सभेपुढे मान्यतेसाठी आला.

दहा हजार माजी सैनिकांना फायदा

नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केवळ सर्वसाधारण करात सवलत न देता संपूर्ण मिळकतकरात सूट देण्याची मागणी केली. त्यानंतर सर्वपक्षीय उपसूचना देऊन हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

शहरातील माजी सैनिक, हुतात्मा पत्नी, तसेच शौर्यपदक विजेते यांचा मिळकतकर पूर्णपणे माफ करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.

यामुळे महापालिका हद्दीतील दहा हजारांपेक्षा अधिक माजी सैनिकांना याचा फायदा होणार असल्याची माहिती सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली.

You might also like
2 li