पुणे : तुम्ही परीक्षा देताना कॉपी (Copy) करण्याचे अनेक प्रकार ऐकले असतील. पण पिंपरी चिंचवड पोलीस भरती परीक्षेत (Police Recruitment Exam Copy) सिनेस्टाइल कॉपी केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता.

राहुल गायकवाड (Rahul Gaikwad) ​असे आरोपीचे नाव आहे. तो औरंगाबादमध्ये पोलिस कॉन्स्टेबल (Aurangabad Police Constable) आहे. राहुल गायकवाड ची चौकशी सुरु असताना चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मोबाईल वाला मास्क तयार करणाऱ्या राहुल्याच्याच सासऱ्याची पोलीस प्रशिक्षण अकॅडमी (Police Training Academy) असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. राहुल गायकवाड हा सासऱ्यासोबत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी चालवत होता.

Advertisement

राहुलचे 4 नातेवाईकही पोलीस दलात आहेत. हे सर्वजण ग्रामीण भागातील तरुणांना कॉपीच्या जाळ्यात ओढत असल्याचे समोर येत आहे. राहुल गायकवाड याला औरंगाबाद मध्ये अटक करण्यात आली आहे.

त्यामुळे औरंगाबादमध्ये (Aurangabad) या सर्व प्रकरणाची मुळे कुठपर्यंत रोवली आहेत. याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या तपासात आणखी धक्कादायक माहिती उघड झाल्याचे पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad Police Commissionerate) 720 पदांसाठी राज्यात 19 नोव्हेंबरला भरती पार पडली होती. यावेली परीक्षा केंद्रावर नितीन मिसाळ (Nitin Misal) याच्या मास्क मध्ये मोबाईल आढळला होता.

Advertisement

नितीन मिसाळ ला उत्तरे सांगण्यासाठी औरंगाबादमधील रामेश्वर शिंदे आणि गणेश वैद्य मदत केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची मुळे कुठपर्यंत खोल रुतली आहेत याचा तपास करण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.