Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

मिठीच्या महापुरावर पाणी वळविण्याचा उतारा

विहार, तुळशी धरण भरल्यानंतर त्यांच्या सांडव्याचे पाणी मिठी नदीमध्ये नैसर्गिकरीत्या वाहून येते. त्यामुळे मिठी नदीचा धोका अधिक वाढतो. यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून महापालिकेने हे सांडव्याचे पाणी वळविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्राथमिक अभ्यास सुरू झाला आहे.

सांडव्याचे पाणी वळवणार

विहार-तुळशी धरण भरल्यानंतर सांडव्याचे पाणी मिठी नदीत वाहून जाते. हा नैसर्गिक प्रवाह, त्यात जोरदार पावसाचे पाणी, नदीत येणारे सांडपाणी, यामुळे नदीची पातळी वाढलेली असतेच.

त्याचबरोबर समुद्राला भरती असल्याने खाडीतील पाणी थेट कुर्ल्याच्या पुढेपर्यंत नदी पात्रात येते. त्यामुळे शीव, कुर्ला, कलिना, सांताक्रूझ या भागाला दरवर्षी फटका बसतो.

Advertisement

महापालिकेने २०२० च्या नोव्हेंबरपासून यासाठी सल्लागार नेमला आहे. पर्जन्यमानाचा अभ्यास करावा लागणार आहे, त्यामुळे दोन वर्ष अभ्यासासाठी लागतील, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

पुढील वर्षापर्यंत अभ्यास अहवाल

पुरावर उपाय म्हणून मिठी नदीत येणारे तलावातील सांडव्याचे पाणी अडविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे. हा सल्लागार पुढील वर्षापर्यंत अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करेल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

स्थलांतराची वेळ

गेल्या आठवड्यात मिठी नदीने दोन वेळा धोक्याची पातळी ओलांडली होती. पहिल्या वेळेस तर समुद्राला भरती नसताना मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे कुर्ला क्रांतीनगरमधील २०० हून अधिक जणांना स्थालांतरित करण्यात आले होते.

Advertisement

अहवालानंतर निश्चित माहिती

तुळशी धरण भरल्यावर सांडव्याचे पाणी विहार तलावात येते. विहार तलाव भरल्यावर सांडव्याचे पाणी नैसर्गिकरित्या मिठी नदीत मिसळते. हे दोन्ही तलाव जुलै महिन्याच्या १५ ते २० दिवसांत भरतात. त्यामुळे यानंतरच्या काळात मिठी नदीचा धोका अधिक वाढतो.

पावसाच्या मोसमात किमान सात दिवस धरणाच्या सांडव्यातून किमान सात हजार दक्षलक्ष लिटर पाणी प्रत्येक दिवशी वाहून जाते, असा अंदाज आहे. संपूर्ण अहवाल तयार झाल्यानंतर याबाबत निश्चित माहिती उपलब्ध होऊ शकेल, असे सांगण्यात आले.

तीन पर्यायांचा विचार

  • पाणी जलबोगद्यातून ऐरोली खाडीत सोडणे.
  • जलबोगद्यातून सांडव्याचे पाणी शुद्धीकरण प्रकल्पात आणणे.
  • प्रकल्पात आणलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पिण्यासाठी वापर.
  • होल्डिंग पॉड बांधून एकाच वेळी नदीत जाणारे पाणी अडवणे.
  • …म्हणून धोका अधिक वाढतो

 

Advertisement
Leave a comment