पुणे : येथील हडपसर (Hadapsar) भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. अभिनेत्री (Actress) तसेच मॉडेल (Model) काम करणाऱ्या तरुणीवर बलात्कार (Rape) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धमकी देत खंडणीचीही मागणी केली आहे.

आरोपीने सदर अभिनेत्री बरोबर शारीरिक संबंध ठेवत फोटो व्हायरल (Photo viral) आणि बदनामी करण्याची धमकी दिली आहे. त्यासोबतच १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार सामोर आला आहे.

याप्रकरणी वारजे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल केला आहे. मेसर्स बॉलिवूड (Bollywood) फिल्मचा राजेश माल्या, अभिजित गणपत साठे आणि त्याची औधं येथील बहिणीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

सादर प्रकरणी अभिनेत्रीने वारजे पोलीस ठाण्यात (Warje police station) तक्रार दाखल केली आहे. २०१७ ते २०२१ च्या दरम्यान हा सर्व प्रकार घडल्याचे तरुणीने सांगितले आहे. या तरुणानीने काही लघुपटात आणि मॉडेल म्हणून काम केले आहे.

आरोपी अभिजीत साठे याने जबरदस्तीने अभिनेत्रींबरोबर शारीरिक संबंध ठेवले. तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. चित्रपटात काम देतो असे सांगत अभिनेत्रींकडून ६ लाख ४१ हजार रुपये घेतले आहेत.

आरोपीने तरुणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपस वारजे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector of Police) ​कथले हे करत आहेत.

Advertisement