file photo

पुणे : जिल्ह्यातील शेलपिंपळ (Shellpimpal) येथील मोहितेवाडी (Mohitewadi) गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकर आणि प्रियसीने एकाच दोरीने फाशी घेत आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला आहे.

यामध्ये प्रियसीचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. तर प्रियकर बेशुद्ध अवस्थेत आढळला आहे. प्रियकराला रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार (Treatment) सुरु आहेत. सुषमा दिनकर सोनवणे (Sushma Dinkar Sonawane) (वय २४ जांबोळशी ता. जुन्नर) असे मृत्युमुखी पडलेल्या प्रियसीचे नाव आहे.

Advertisement

हरिदास कुंडलिक देवचे (Haridas Kundlik devche) (वय २८ रा. जांबोळशी) असे प्रियकराचे नाव आहे.

सुषमा आणि हरिदास यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. त्यातील काही कारणावरून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यात प्रियसीचा जागीच मृत्यू झाला आहे.

सुषमा शिक्रापूरमध्ये एका दवाखान्यात नर्स होती तर हरिदास हा चाकण मधील एका वसाहतीतील खासगी कंपनीमध्ये कामाला होता.

Advertisement

अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर (Sub-Inspector of Police Vinod Shendkar) ​यांनी दिली आहे.

दोघेही शेतातील एका झाडाला फाशी घेण्याचा प्रयत्न करत होते. फाशी घेताना एकाच दोरीने घेतल्यामुळे प्रियकर खाली पडला आणि प्रियसीचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Advertisement