पुणे : पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchawad) शहरात एका भोंदूबाबाने (Bhondubaba) महिलेला (woman) जादूटोणा (Witchcraft) करून माझ्याशी शरीर संबंध (Body relationship) ठेव अशी मागणी केली होती. त्यामुळे शहरात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

महिलेला हा भोंदूबाबा फसवत असल्याचे समोर आले आहे. या भोंदूबाबा विरोधात महिलेने वाकड पोलिस स्थानकात (Wakad police station) तक्रार (Complaint) दाखल केली आहे.

महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक (Shocking) माहिती समोर आली आहे. माझ्याशी शरीर संबंध ठेवले नाही तर तुला कमरेखाली अपंग करेल.

Advertisement

तू लवकर मारणार आहे. तुझा पोटात तीन गाठी आहेत. तुझे थोडेच आयुष्य राहिले आहे. असे म्हणत भोंदूबाबाने महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली होती.

विलास बापूराव पवार उर्फ ‘भोंदूबाबा’ (वय 41, रा. मु. पो. पिंपळवंडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला बीडवरुन अटक करण्यात आली आहे.

हा भोंदूबाबा महिलेला वारंवार फोन करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करायचा. या बाबाने महिलेला एक अश्लील व्हिडीओ (Pornographic videos) पण पाठवला होता. माझ्याशी शरीरसंबंध ठेवले, तर तुमचे सगळे कुटुंब सुखी राहील.

Advertisement

तुम्हाला तुमचे कुटुंब सुखी ठेवायचे असेल तर माझ्याशी शरीरसंबंध ठेवा, असे म्हणून वारंवार शरीरसुखाची मागणी करुन पीडीत महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप भोंदूबाबावर आहे.

वाकड पोलिसांनी सापळा रचत भोंदूबाबाला अटक केली आहे. आरोपीने गुन्हा (Crime) केल्याचे कबुल केले आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 354 (ड), 292, 500, 509 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 67 (ए).

तसेच नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत आणि त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement