पुणे : येथील पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील रहाटणी येथे धक्कादायक (Shocking) घटना घडली आहे. राहत्या घरी माय-लेकीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

शनिवारी माय-लेकीनेआत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुनीता युवराज नवले (Sunita Yuvraj Navale) (वय ३६), श्रावणी युवराज नवले (Shravani Yuvraj Navale) (वय १३) अशी आत्महत्या केलेल्या माय-लेकीची नावे आहेत.

सुनीता आणि श्रावणी नवले यांनी बेडरूम (Bedroom) मध्ये ओढणीच्या साहाय्याने आत्महत्या केली आहे. पोलिसांच्या (Police) माहितीनुसार मयत सुनीता आणि तिझा पती युवराज नवले हे दोघेजण रात्री २ च्या सुमारास घरी आले होते.

Advertisement

त्यावेळी घरातील सर्वजण गप्पा मारत बसले होते. सुनीता आणि श्रावणी बेडमध्ये झोपायला गेले, तर युवराज नवले हे टेरेसवर झोपण्यासाठी गेले. सकाळी युवराज यांचा मुलगा स्वराज (वय १०) याने बेडचा दरवाजा वाजवला.

बेडचा दरवाजा वाजवल्यानंतर आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे स्वराज हा वडिलांना उठवण्यासाठी टेरेसवर गेला. वडिलांनी बेडचा दरवाजा तोडल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

Advertisement