कोल्हापूर : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार राज्यात २०१९ साली स्थापन झाले. यावेळी राज्य सरकारने (State Goverment) शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्यानंतर शेतकऱ्यानसाठी कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी म्हंटले आहे.

शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी नाराजी व्यक्त करत आघाडी सरकारला इशाराही दिला असल्याचे दिसत आहे.

राजू शेट्टी यांनी शरद पवार यांना लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी भूमिका आहे.

Advertisement

त्यामुळे गेल्या पाच वर्षात जे पदरी पडले नाही ते या सरकारच्या काळात तरी मिळेल अशी (Farmer) अपेक्षा शेतकऱ्यांना होती. आता सरकार स्थापन होऊन दोन वर्ष उलटली आहेत.

असे असतानाही शेतकऱ्यांच्या हीताचा तर सोडाच पण सर्व काही नुकसानीचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे (Loss of farmers)शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

शेतक-याच्या महाविकास आघाडीकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या पण हळूहळू त्या अपेक्षांना तडे जाऊ लागले आहेत. कर्जमाफीचा एक मुद्दा सोडला तर कुठल्याच गोष्टी शेतक-यांच्या मनासारखे होत नाही.

Advertisement

त्यामुळे शेतकऱ्यांचा या सरकारकडून अपेक्षाभंग झालेला आहे. ऊसाचे दरावरुन समितीची स्थापना, एफआरपीचे तुकडे यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास कमी होत आहे.

सरकारमधील नेत्यांची मनमानी आणि मुलभूत प्रश्नांकडे होत असलेले दुर्लक्ष हे असेच राहिले तर सरकार ढासळेल असा इशाराही राजू शेट्टी यांनी पत्रामध्ये दिला आहे.

पत्रात राजू शेट्टी यांनी पुढे असे लिहले आहे की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या विषयावर सर्व घटकांशी सखोल चर्चा करून निर्णय घेण्याऐवजी महाविकास आघाडी सरकार हे सचिन वाझे प्रकरण, आरोग्य भरती घोटाळा.

Advertisement

म्हाडा पेपर फुटी, टीईटी घोटाळा, कोरोना काळातील जंबो कोविड सेंटर व औषध खरेदी घोटाळा यातच गुरफटून गेले असल्यामुळे जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही.

शेतकऱ्यांच्या मुबभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले तर आणि या महाविकास आघाडी सरकारमधील मुख्य नेत्यानेच याकडे दुर्लक्ष केले आणि सर्व गोष्टी वेळीच सावरले नाहीत तर महाविकास आघाडीचा डोलारा ढासळायला वेळ लागणार नाही. असेही राजू शेट्टी म्हणाले आहेत.

Advertisement