ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

माैजमजा पडली महागात, दोघांचा मृत्यू

सुटीसाठी फिरायला गेल्यानंतर काळजी घेतला नाही, तर ते जीवावर बेततं, असा अनुभव दररोज येत असतो. माैजमजा अवश्य केली पाहिजे; परंतु ती करताना काळजी घेतली पाहिजे. तशी ती न घेतल्यानं एका तरुणाचा आणि एका मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.

ही आहेत मृतांची नावे

वसईच्या सुरुची बाग समुद्र किनाऱ्यावर फिरायला आलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

अजित मयपाल विश्वकर्मा (वय 13)) आणि रणजीत शिवकुमार विश्वकर्मा (वय 20)) असं मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावं आहेत. हे दोघेही नालासोपारा पूर्व परीसरातील संतोषभूवन येथील रहिवासी आहेत.

मौजमस्ती करण्यासाठी गेले होते समुद्रात

नालासोपाऱ्यातील संतोष भवन येथून 7 ते 8 जणांचा ग्रुप वसईच्या सुरुची बाग येथे फिरायला आला होता. सुट्टीचा दिवस असल्यामुळे त्यांनी फिरायला जाण्याची योजना आखली होती.

या वेळी मौजमस्ती करताना अजित आणि रणजित हे दोघेही पोहण्यासाठी खोल समुद्रात गेले. पोहत असताना या दोघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. पोहत असताना शेवटी हे दोघेही समुद्राच्या पाण्यात बुडाले.

घरी जाण्यापूर्वीच दुर्घटना

ही घटना समजताच वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान आणि वसई पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बुडालेल्या दोन्ही तरुणांना बाहेर काढले.

रणजित विश्वकर्मा हा एका महिन्यापूर्वीच उत्तर प्रदेशवरून घरी आला होता. सोमवारी तो परत उत्तर प्रदेशला जाणार होता. मात्र त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली.

लातुरात तीन भावंडांचा बुडून मृत्यू

अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव शेंद्री या ठिकाणी ज्ञानोबा जायभाये आणि तुकाराम जायभाये हे दोघे सख्खे भाऊ राहतात. नेहमीप्रमाणे दोन भाऊ शेतावर गेले होते.

त्या वेळी ते आपल्या तिन्ही मुलांनाही शेताकडे घेऊन गेले. त्या वेळी त्यांची तिन्ही मुले शेळ्या चारत मन्याड नदीपात्राजवळ आली. तेव्हा त्यांना लाकडाचे ओंडके दिसले.

त्यामुळे त्यांना पाण्यात तरंगण्याचा मोह आवरला नाही. शेतात शेळ्या चरत असताना त्या लाकडाच्या ओंडक्यावर बसून हे तिघेजण पाण्यावर तरंगण्याचा प्रयत्न करू लागले; मात्र अचानक त्यांचा तोल गेल्याने ते नदीपात्रात पडले. या तिघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

 

You might also like
2 li