file photo

पालघर :आैद्योगिक वसाहतीतील रासायनिक प्रकल्पांना आगी लागण्याचे आणि स्फोट होण्याचे प्रकार काही थांबायला तयार नाही.

रत्नागिरी लोटे एमआयडीसीतील घटनेनंतर आता पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीतील भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट झाला.

त्यात पाच कामगार जखमी झाले. या सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Advertisement

स्फोटाच्या कारणाचा शोध सुरू

हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

कारखान्यात आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्या.

त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियमंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

Advertisement

वाडा कोसळल्यामुळे दोन महिला गंभीर जखमी

नाशिमकमध्ये धनगर गल्ली येथे वैश्य वाडा अचानकपणे खाली कोसळला. या दुर्घटनेत दोन महिला गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. या दोन्ही महिला खाली सुरू असलेल्या खोदकामाच्या खोल खड्ड्यात पडल्या.

हा प्रकार समोर आल्यानंतर अग्निशमन दलाच्या जावानांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी या महिलांना मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले.

या महिलांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पाच वर्षांचा मुलगा आणि त्याच्या वडीलांनाही बाहेर काढण्यात आलं.

Advertisement

वाडयाचं सुरू होत नूतनीकरण

मिळालेल्या माहितीनुसार वाड्याच्या पाठीमागे एका वाड्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू होतं. त्याचे हादरे बसून वैश्य वाडा कोसळल्याचा प्रार्थमिक अंदाज आहे.