मुंबई – गणेशोत्सवाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह (Amit Shah) नुकतेच मुंबई (mumbai) दौऱ्यावर आले होते. अमित शाह (Amit Shah) रविवारी रात्री मुंबईत दाखल झाले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी त्यांचे स्वागत केलं.

दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान शाह यांनी सर्वप्रथम लालबागच्या राजाचे (lalbaugcha raja) दर्शन घेतले. सकाळी 10 वाजता त्यांनी लालबागचा राजा मंडळाला भेट दिली असून, काही महत्वाच्या बैठकांना सुद्धा हजेरी लावली होती.

यावेळी अमित शहा यांनी मुंबई महापालिका निवडणुकातील भाजपा (BJP) आणि एकनाथ शिंदे गट (CM Eknath Shinde group) यांची शिवसेना एकत्र लढणार असल्याची घोषणा केली.

त्यांनी मुंबई महापालिकेत 150 नगरसेवकांचे टार्गेट भाजपाला दिले. यावेळी त्यांनी मुंबईत भाजपाचेच वर्चस्व राहाय़ला हवे, असा सल्लाच सर्व भाजपा नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

तसेच, त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. “शिवसेनेने 2014 साली केवळ दोन जागांसाठी युती तोडली असा आरोपही अमित शाह (Amit Shah) यांनी केला आहे.

शिवसेना फोडण्यास भाजपा जबाबदार असल्याच्या आरोपांनाही यावेळी शाह (Amit Shah) यांनी उत्तर दिले आहे. स्वताच्या निर्णयामुळे शिवसेना छोटा पक्ष झाला असून, उद्धव ठाकरेंना धडा शिकवा असा आदेश त्यांनी यावेळी दिला.

मात्र, अमित शाह यांनी ‘उद्धव ठाकरेंना धडा शिकवा’ असा आदेश दिल्यानंतर शिवसेना नेत्यांकडून त्यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे.

उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनीही अमित शाह यांच्या टीकेला उत्तर दिलं असून, ‘मुंबईत मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती दोन्ही पाहिले’ असा टोला लगावला आहे.

यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली असून ते निराशेतून बोलत असल्याचं म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले….

“सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरेंना निराशा आली आहे. या निराशेतून ते बोलत आहेत. अशा निराश लोकांवर फार काही बोलायचं नसतं,” असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.