विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक विधानसभेच्या अधिवेशनातच घेण्याचा काँग्रेसचा आग्रह होता; परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं आमदारांच्या कोरोना चाचणीचं कारण पुढं करून विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होऊ दिली नाही. आता राज्यसभेची पोटनिवडणूक पुढं ढकलून काँग्रेसला आणखी एक शह दिला आहे.

राज्यसभा पोटनिवडणूक लांबणीवर

काँग्रेसचे नेते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर टीका करीत आहेत. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे.

काँग्रेसकडून सातत्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका सुरू केली असताना या दोन्ही पक्षांनीही काँग्रेसची कोंडी करायचे ठरविले आहे. राज्यसभेची पोटनिवडणूक एक वर्ष लांबणीवर टाकून काँग्रेसला शह दिला आहे.

Advertisement

कोरोनाचं कारण

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपाठोपाठ आता राज्यसभा पोटनिवडणूकही लांबणीवर टाकण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निश्चित केले आहे.

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आणि डेल्टा विषाणूचे कारण पुढे करीत राज्य सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाला राज्यसभा पोटनिवडणूक कोरोना साथीत न घेण्याची विनंती केली आहे.

सातव यांच्या निधनामुळं जागा रिक्त

राज्यातून मार्च २०२०मध्ये राज्यसभेवर निवडून गेलेले काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे १६ मे रोजी निधन झाले.

Advertisement

त्यानंतर राज्यसभा सचिवालयाने १९ मे रोजी सातव यांच्या निधनामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाल्याबाबतची अधिसूचना काढली होती.

त्यानुसार ३० जूनला केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र पाठवून राज्यसभा पोटनिवडणूक घेण्याबाबत विचारणा केली होती.

आयोगाच्या या पत्राला मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी पत्र पाठवून सध्या निवडणूक घेण्याबाबत असमर्ता दाखविली.

Advertisement

राज्यसभेच्या या जागेची मुदत एक वर्ष राहिली असल्यानं आता ती निवडणूक होऊच नये, असा राज्यातील दोन्ही प्रमुख पक्षांचा प्रयत्न आहे.

कमी कालावधी मिळणार

राज्यसभेची जागा जास्तीत जास्त एक वर्षासाठी रिक्त ठेवता येते. दिवंगत राजीव सातव यांची मुदत मार्च २०२६ मध्ये संपणार होती.

त्यामुळे सातव यांच्या जागी राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या सदस्याला पोटनिवडणूक जेवढी लांबेल तेवढा राज्यसभा सदस्यत्वाचा कमी कालावधी मिळणार आहे.

Advertisement