Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

मुंबईत बनावट लसीकरण, दोन हजार नागरिकांची फसवणूक

मुंबई : मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार चर्चेत असतो. कथित समाजसेवेच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत असून बनावट लसीकरण करून नागरिकांच्या जीविताशी खेळ केला आहे.

उच्च न्यायालयाकडून दखल

कांदिवली, बोरिवली, वर्सोवा, खार अशा वेगवेगळ्या ठिकाणी बनावट लसीकरणाची शिबिरे घेऊन २,०५३ नागरिकांची फसवणूक करण्यात आली, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली.

आतापर्यंत मुंबईत नऊ बनावट लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात आली आणि याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,

Advertisement

अशी माहिती मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली.

चारशे साक्षीदारांचा जबाब

सध्या याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाचा अहवालही ठाकरे यांनी न्यायालयात दाखल केला. कांदिवली येथील हिरानंदानी सोसायटी बनावट लसीकरण शिबीरप्रकरणी संबंधित डॉक्टरांची माहिती मिळवताना ४०० साक्षीदारांचा जबाब नोंदवला. यात कमीत कमी २,०५३ नागरिकांना फसवण्यात आले आहे.

या बनावट लसीकरण शिबिरांप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही आरोपींची ओळख पटली असून, अनेक अज्ञात लोकांनाही आरोपी करण्यात आले आहे.

Advertisement

‘त्या’ नागरिकांच्या आरोग्याचे काय?

मुंबईत भरविण्यात आलेल्या नऊ बनावट लसीकरण शिबिरांमध्ये लस घेतलेल्या नागरिकांचे काय? त्यांना लसीच्या नावाखाली काय देण्यात आले आणि त्याचा त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होणार आहे?

याची आम्हाला चिंता आहे, असे न्यायालयाने म्हटले. त्यांच्या आरोग्यावर झालेल्या परिणामांच्या तपासणीसाठी काय करणार आहात? अशी विचारणाही न्यायालयाने पालिकेकडे केली.

Advertisement
Leave a comment