पुणे : वयाच्या १७ व्य वर्षी वैशाली आणि रुपाली हॉटेलचे (Vaishali and Rupali hotels) मालक जगन्नाथ शेट्टी (Jagannath Shetty) यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ९१ व्य वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले (Passed away) आहे.

कर्नाटक (Karnataka) राज्यातील ओणिमजालू (Onimjalu) नावाच्या गावात त्यांचा ८ ऑक्टोबर जन्म १९३२ साली त्यांचा जन्म झाला होता. जगन्नाथ शेट्टी (Jagannath Shetty) हे अवघे १३ वर्षाचे असताना कर्नाटक सोडले होते.

कर्नाटक सोडल्यानंतर जगन्नाथ शेट्टी हे कल्याण (kalyan) येथे आले. आणि तिथे त्यांनी ३ रुपयांवर नोकरी सुरु केली होती. पुढे त्यांनी १७ व्या वर्षात पुण्यामध्ये (Pune) येऊन वैशाली आणि रुपाली हॉटेल काम करण्यास सुरुवात केली.

Advertisement

पुण्यामध्ये येऊन त्यांनी मनापासून वैशाली आणि रुपाली हॉटेलमध्ये काम केले. नंतर ते स्वतः त्याच हॉटेलचे मालक झाले. रुपाली हॉटेल नावारुपाला आणण्यासाठी शेट्टी यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

अत्यंत कष्टाने उभे केलेलं हॉटेल (Hotel) पुरस्कारांनी हॉटेल वैशालीला गौरविण्यात आले आहे. तसेच अनेक सेलिब्रिटी, राजकारणी यांचे हॉटेल वैशाली आवडीचे ठिकाण बनले आहे. आजही हॉटेल वैशालीमध्ये पोटभर जेवणासाठी ग्राहक रांगा लावून उभे असतात.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy cm Ajit Pawar) यांनीही वैशाली आणि रुपाली हॉटेलचे मालक जगन्नाथ शेट्टी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Advertisement

सचोटीने व्यवसाय करत पुण्याच्या खाद्यसंस्कृतीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा, सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श हॉटेल व्यावसायिक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

गेली अनेक दशकं पुण्यातील हॉटेल वैशाली, रुपाली आणि आम्रपालीच्या माध्यमातून जगन्नाथ शेट्टी यांनी पुणेकरांच्या हृदयात स्वतंत्र स्थान निर्माण केलं. सचोटीने व्यवसाय करत पुण्याच्या खाद्यसंस्कृतीत मोलाची भर टाकली.

पुणे शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक वाटचालीतील ते अनेक महत्वाच्या घटनांचे साक्षीदार राहिले आहेत. त्यांचे हॉटेल ही पुण्याच्या राजकीय, सामजिक, सांस्कृतिक चळवळींची केंद्र राहिली आहेत. असेही अजित पवार म्हणाले.

Advertisement