पुणे : राज्यातील हवामान (Maharashtra Weather) दिवसेंदिवस बदलत असल्यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) याचा चांगलाच फटका बसत आहे.

हातातोंडाला आलेल्या पिकांवर रोग (Diseases on crops) पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान (Financial loss) ​होत आहे.

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या अवकाळी पाऊस (Untimely rain) आल्यामुळे कांदा (Onion) पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. जास्तीतजास्त फटका लाल कांद्याला बसला आहे.

Advertisement

हा लाल कांदा (Red onion) भिजल्यामुळे सध्या बाजारात त्याला कमी भाव मिळत आहे. अपेक्षेएवढे भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. डिसेंबर महिन्यात हळवी कांद्याचा हंगाम सुरु होतो.

नेमका डिसेंबर महिन्यात झालेल्या पाऊसामुळे काढणीला आलेला लाल कांदा भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. बाजारात सध्या भिजलेल्या कांद्याची आवक होत आहे.

एकूण आवके पैकी ७५ टक्के लाल कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला असल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील (Chhatrapati Shivaji Market Yard) कांदा व्यापारी रितेश पोमण (Onion trader Riteish Poman) यांनी सांगितले आहे.

Advertisement

बाजारात (market) नवीन लाल कांद्याची सरासरी ४० ते ५० ट्रक, तसेच जुन्या कांद्याची २५ ते ३० ट्रक आवक होत आहे. लाल कांदा भिजला असल्याने परराज्यातून मागणी कमी आहे. असेही रितेश पोमण यांनी सांगितले आहे.