Mumbai: Shiv Sena leader Sanjay Raut addresses a press conference in Mumbai, on Oct 12, 2015. (Photo: IANS)

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या (Neel Somaiya) यांच्यावर गाम्भीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांचे आरोपसत्र सुरूच असल्याचे दिसत आहे.

पत्रकार परिषदेमध्ये पीएमसी बँक (PMC Bank) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी वाधवान याच्याशी निल सोमय्या याचा संबंध असल्याचा आरोप केला होता.

मुंबई पोलिसांच्या ईओडबल्यूनं आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या पर्यावरण विभागाने निकॉन इन्फ्रावर कारवाई करण्याबाबत विचारा करावा असे संजय राऊत यांनी म्हंटले होते.

Advertisement

संजय राऊत यांच्या लक्षवेधी पत्रकार परिषदेनंतर भाजप नेत्यांनीही पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र संजय राऊत काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीत.

भाजपाचे (BJP) नेते मोहित कंबोज यांनीही पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. तसेच मनसेने (MNS) देखील संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

संजय राऊत यांनी बाप बेटे जेल मध्ये जाणार, वेट अँड वॉच, कोठडीचे सॅनिटायझेशन सुरु आहे अशा आशयाचे ट्विट (Twit) केले आहे. त्यानंतर मोहित कंबोज यांनीही या ट्विट ला उत्तर दिले आहे.

Advertisement

Advertisement

सलीम – जावेद ची जोडी जेलमध्ये जाणार, वेट अँड वॉच असे ट्विट करत संजय राऊत यांच्या ट्विट ला मोहित कंबोज यांनी उत्तर दिले आहे.