ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

लसीकरण केंद्रावर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांत राडा

कोरोना लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत असताना पुरेशी लस येत नाही. त्यातच ओळखीने, वशिल्याने लसीकरणासाठी सोडण्यात आल्याचा आरोप अनेक ठिकाणी होतो.

त्यावरून वाद, हाणामारी होते. बदलापूर येथील केंद्रावर याच कारणामुळे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांत राडा झाला.

कार्यकर्त्याच्या डोक्यात बेंच टाकला

बदलापुरात कोरोना लसीकरण केंद्रावरच शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. बदलापूर पालिकेच्या दुबे रुग्णालयात हा प्रकार घडला. हाणामारीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

कोरोना लसीकरण केंद्रांवर राजकीय कार्यकर्ते वशिलेबाजी करत असल्याच्या तक्रारी बदलापुरात अनेकदा समोर आल्या होत्या. त्यातच आज बदलापूर पालिकेच्या दुबे रुग्णालयात शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते थेट एकमेकांशी भिडल्याचं पाहायला मिळालं.

दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. अक्षरशः खाली पाडून लाथाबुक्यांनी एकमेकांना तुडवण्यात आलं. या वेळी एका गटाच्या कार्यकर्त्याने दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्याच्या डोक्यात थेट बेंच टाकला.

हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद

लसीकरण केंद्रावर काही काळ मोठा तणाव निर्माण झाला. हाणामारीचा हा सगळा प्रकार लसीकरण केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. अशा राडेबाज कार्यकर्त्यांमुळे राजकीय पक्षांची प्रतिमा मात्र मलीन झाली आहे.

दरम्यान, या प्रकाराबाबत बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

You might also like
2 li