कुणाचा राग कशानं अनावर होईल आणि तो काय करील, याचा भरवसाच देता येत नाही. आईला कामावरून टाकल्याचा राग अनावर झाल्याने एकाने कंपनीत घुसून तोडफोड केली आणि कोयत्याने वार केले. हा प्रकार कोंढवा परिसरात झाला.

पाच जणांना अटक

आईला कामावरून काढून टाकल्याने साथीदारांना घेऊन कंपनीत शिरून टोळक्याने कोयत्याने तोडफोड करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

विकास राजेंद्र जानकर (वय २२, रा. येवलेवाडी, कोंढवा), केतन गंगाराम मोरे (वय २१, रा. पिसोळी), राजेश संभाजी चव्हाण (वय २६, रा. पिसोळी), सागर मुकुंद आहिरराव (वय २५), चेतन किशोर पाटील (वय २३, सर्व रा. पिसोळी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Advertisement

ही घटना कोंढव्यातील टाईनिंग को़ औद्योगिक वसाहतीत घडली. याप्रकरणी श्रीधर माधवराव नायडू (वय ६२, रा. वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे.

कंपनीत दहशत

नायडू यांच्या कंपनीत सागर आहिरराव याची आई सरीता आहिरराव या पूर्वी कामाला होत्या. त्यांना कंपनीने कामावरून काढून टाकले होते. या कारणावरुन सागर याने आपल्या साथीदारांना घेऊन कंपनीत प्रवेश केला.

कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या हातावर मारले. त्याच्या साथीदारांनी हातामधील कोयत्याने कंपनीच्या कार्यालयामधील तीन केबीनच्या काचा फोडून नुकसान केले.

Advertisement

तसेच कोयते हवेत फिरवून कंपनीमधील कामगारांवर दहशत निर्माण केली. त्याला घाबरुन कामगार पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिस तातडीने कंपनीत गेले. त्यांनी पाच जणांना अटक केली आहे.

 

Advertisement