काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्यनं खळबळ माजवली आहे.

यामुळे राजकीय वातावरणाला चांगलेच वळण लागले आहे. नाना पटोलेनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी निषेध करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यादरम्यान, भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Advertisement

या प्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

ही तक्रार नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात नागपूरच्या कोराडी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आंदोलन बसवले आहे.

तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर नाना पटोले वरती का नाही असा सवाल बावनकुळे यांनी केला आहे.

Advertisement